जयश्री ताईंच्या नावातच "जय"..त्यामुळे एक हजार एक टक्के विजय! नरेंद्र खेडेकरांना विश्वास; म्हणाले, इथला आमदार खोके घेऊन पळून जाणारा....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जयश्रीताई शेळके यांच्या नावातच जय आहे.. त्यामुळे विजय एक हजार एक टक्के जयश्रीताई शेळके यांचाच होणार आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय संवेदनशील मतदार संघ आहे. एकदा आमदार झालेला येथे दुसऱ्यांदा आमदार होत नाही हा इतिहास आहे..त्यामुळे २०१९ ला निवडून आलेला पुन्हा दिसणार नाही..तुमचा इथला आमदार कुठे घेऊन पळून जाणारा आहे असा हल्लाबोल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला. काल,२९ ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी नामांकन अर्ज दाखल केला यावेळी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना खेडेकर यांचे भाषण चांगलेच गाजले...

पुढे बोलतांना नरेंद्र खेडेकर म्हणाले की, मागच्या अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा जोडीने राजकारणात हैदोस घातला.हलकटीचे राजकारण केले.यामुळे सर्वसामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडत चालला होता. ५० खोके घेऊन पळून जाणार तुमचा बुलडाणा येथील आमदार होता. बुलडाणा मतदारसंघात अतिशय संवेदनशील मतदार आहे. एकदा निवडणूक आलेल्या माणसाला हा मतदारसंघ पुन्हा निवडून देत नाही.त्यामुळे २०१९ ला निवडून आलेला पुन्हा दिसणार नाही. जयश्री ताई शेळके यंदा १००१ टक्के निवडून येणार कारण जयश्रीताईंच्या नावातच जय आहे असे म्हणताच गर्दीतून टाळ्यांचा एकच गजर झाला. आपल्या भाषणातून खेडेकर यांनी महायुती सरकारच्या धोरणांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. मुहूर्त नसतांना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचे लोकार्पण केल्याचेही नरेंद्र खेडेकर म्हणाले. राज्य सरकार असंवैधानिक पद्धतीने, खोक्यामुळे अस्तित्वात आले.मात्र आता हे खोके सरकार उलथून टाकण्यासाठी जयश्रीताईंच्या पाठीशी उभे रहा आणि मशाल पेटवा असे आवाहन त्यांनी केले.इथले आमदार मत विभाजन करण्यासाठी काही लोकांना उभे करतील मात्र त्यांचे राजकारण नीट समजून घ्या.मत विभाजन होऊ देऊ नका असे आवानही नरेंद्र खेडेकर यांनी केले....