श्रीगणेशा झाला! आज दोन उमेदवारी अर्ज दाखल ! खामगाव विधानसभा मतदारसंघात "या" दोघांनी भरले अर्ज...

 
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 अंतर्गत बुलढाणा जिल्‍ह्यातील सात मतदारसंघात दुसऱ्या दिवशी, बुधवार दि. 23 ऑक्टोंबर 2024 रोजी खामगांव  विधानसभा मतदारसंघातून दोन नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. दरम्यान आज सात मतदारसंघात एकूण 105 व्यक्तींनी 187 नामनिर्देशन अर्जाचे उचल केले. 

 

मतदारसंघ निहाय माहिती 

 21-मलकापूर विधानसभा मतदारसंघात 19 व्यक्तीनी 33 अर्ज, 22-बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 6 व्यक्तीनी 11 अर्ज, 23-चिखली विधानसभा मतदारसंघात 14 व्यक्तीनी 23 अर्ज, 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 14 व्यक्तीनी 24 अर्ज, 25-मेहकर विधानसभा मतदारसंघात 15 व्यक्तीनी 27 अर्ज, 26-खामगांव विधानसभा मतदारसंघात 12 व्यक्तीनी 20 अर्ज व 27-जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 25 व्यक्तीनी 49 अर्ज असे एकूण 105 व्यक्तींनी 187 अर्ज उचल केले आहे. तर खामगांव मतदारसंघात दोन उमेदवा़रांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले असून श्री. शुद्धोधन भारत साळवे व श्री. गौरव तुळशिराम सपकाळ या दोघांनी अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

 

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि. 29 आक्टोंबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार दि.  20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.