अपक्ष उमेदवार संदीप शेळकेंचा आज चिखलीत भव्य रोडशो,  बुलढाण्यात सायंकाळी ' एक शाम संदीप शेळके नाम' मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन! 

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अपक्ष उमेदवार तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या प्रचारार्थ आज चिखली शहरात सायंकाळी भव्य रोडशो चे आयोजन करण्यात आले आहे.  तर बुलढाण्यातील जिजामाता पेक्षागार समोरील प्रांगणात 'एक शाम संदीप शेळके के नाम' या मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्हाभर संदीप शेळकेंचा प्रचार धुमधडाक्यात सुरू असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. 

 विकासाचे व्हिजन घेऊन निघालेल्या संदीप शेळकेंना सामान्य जनता, तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदाची लोकसभा निवडणूक जिल्ह्याचे भवितव्य घडविणारी आहे. परिवर्तनाचे घटक होण्यासाठी कॅमेरा चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन संदीप शेळके यांनी केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात संदीप शेळकेंचा रोडशो काढण्यात येत आहे. दरम्यान  आज सकाळी हिवरा आश्रम, साखरखेर्डा येथे शेळके यांची प्रचार रॅली संपन्न झाली. शेळकेंना जनतेचे प्रेम मिळत आहे. गावोगावी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. जनतेचा कौल परिवर्तनाच्या दिशेने आहे, विकासासाठी आहे त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा शेळकेंनी केला आहे. 

चिखलीतील आजचा रोड शो 'असा' ! 

सायंकाळी चार वाजता चिखली शहरात संदीप शेळकेंचा रोडशो काढण्यात येणार आहे. राऊतवाडी स्टॉप, पंचायत समिती, बैल जोडी, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व त्यानंतर खामगाव चौफुल्लीतून  रोडशो संपन्न होणार आहे.

संध्याकाळी बुलढाण्यात मुशायरा ! ' एक शाम संदीप शेळके के नाम' 
 
आज रविवार, २१ एप्रिलला सायंकाळी ६  वाजता स्थानिय जिजामाता प्रेक्षागार समोरील प्रांगणात ऑल इंडिया मुशायरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध शायर अबरार कशीफ, जोहर कानपुरी, शबीना अदिब, अजीम रायपुरी, जमीर साहिर, हमीद भुसावली, अल्ताफ जिया,  मुस्तकीम अरशद, रियाज अन्वर, समीर बुलढानवी, उमर बुलढानवी,  असिफ मुनव्वर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.   अशा दिग्गजांच्या शायरी प्रस्तुतीतून शायराना मैफिल रंगणार आहे.