तिसऱ्या टप्प्यात वाढला वेग! खामगावची शंभरी!!
विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या टप्प्यात 140 सदस्यांनी मतदान केले. यात 67 पुरुष तर 73 महिलांचा समावेश आहे. खामगावमधील सर्वच म्हणजे 37 नगरसेवकांनी मतदान केले. शेगावमध्ये 90.63 टक्के (32 पैकी 29 मतदार जणांचे) मतदान पार पडले. जळगाव जामोदमध्ये 21 पैकी 20 जणांनी मतदान केल्याने हा आकडा 95.24 टक्केच्या घरात पोहोचला. बुलडाणा केंद्रावर 35 (34 टक्के), चिखलीत 14(46 टक्के), सदस्यांनी मतदान केले.
3 ठिकाणी भोपळाच : 3 केंद्रांवर नाममात्र मतदान
दरम्यान, दुपारी 2 वाजेपर्यंत मलकापूरमधील 32, लोणार 20, नांदुरामधील 26 सदस्य मतदान केंद्राकडे फिरकलेच नाय! पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातील देऊळगाव राजा व सिंदखेड राजात प्रत्येकी दोघांनीच मतदान केलं. मेहकर केंद्रावर एकमेव मतदानाची नोंद आहे. यामुळे ताळमेळ न जमल्याने सदस्यांचा केंद्रात मेळ जमला नसल्याची मजेदार चर्चा रंगली! 2 वाजेपर्यंत केवळ 38 टक्केच मतदान झाल्याने, ताळमेळ जमल्यावरच शेवटच्या 3 तासांत धो धो मतदान होईल असा रागरंग आहे.