बुलडाण्यात ना. अंबादास दानवे घेणार जनता दरबार? 'ऑन द स्पॉट' समस्या सोडविणार!  उपस्थित राहण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे आवाहन

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारणाचे तत्व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहे. त्यानुसार संकटकाळी हाकेला ओ देत आपल्या पदांना न्याय देण्याचे काम शिवसैनिक करीत असतात. बुलडाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते नामदार अंबादास दानवे हे 'जनाधिकार' चे माध्यमातून जनता दरबार घेत आहेत. या जनता दरबाराचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व वसंतराव भोजने यांनी केले आहे.

लडाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन येथे १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता या जनाधिकार मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यामध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, यासह विविध विभागांच्या अंतर्गत असलेल्या जन समस्यांचा निपटारा ऑन दी स्पॉट करण्यात येणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते नामदार अंबादास दानवे हे स्वतः या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत. आपल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी लेखी तक्रारीसह कागदपत्रे घेऊन गरजूंनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.