जिल्ह्यातील निवृत्तीवेतन- धारकांसाठी महत्वाची बातमी! ८ ऑक्टोबरचा दिवस महत्वाचा....
Oct 3, 2024, 17:47 IST
बुलडाणा (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचा संवाद मेळावा दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हा कोषागार कार्यालय बुलडाणा येथील प्रशिक्षण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या संवाद मेळावास सर्व सेवानिवृत्त धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. ऋषीकेश वाघमारे यांनी केले आहे.