अतिवृष्टीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या!  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात निवेदन ...

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा जिल्ह्यात खास करून घाटाखालील भागात मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.  नागरी वस्त्यांचे देखील नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर वरील पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे तात्काळ सर्वेक्षण होऊन शेतकऱ्यांना मदतीसाठी पावली उचलण्यात यावीत, अशी मागणी बुलडाणा जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, छगन मेहेत्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवेदनात नमूद आहे की,
बुलडाणा जिल्हा हा नैसर्गिकरीत्या दोन भागामध्ये विगालेल्या गेलेला आहे. घाटाखाली मलकापुर, शेगांव, नांदुरा, जळगांव जामोद, संग्रामपुर या ५ तालुक्यातील २० महसुल मंडळामध्ये एकाच दिवशी अतीवृष्टी झाल्याची नोंद आहे. १८ ते २० जुलै दरम्यान जल्हियातील या भागात सुमारे १ लाख हेक्टर वरील शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे मलकापुर शहर, व परीसरातील परीस्थीती गंभीर बनली होती. जिल्हाधिकारी यांनी स्वतः मलकापुर, नांदुरा या भागामध्ये परीस्थितीची पाहणी केली आहे.
काल दिनांक २१ जुलै पासुन पुन्हा पावसाने जोर धरला असुन जळगांव जामोद, संग्रामपुर तालुका परीसरात प्रचंड नुकसान होत आहे. नदया नाल्या तुडुंब भरुन वाहत आहेत. नदयां पात्र सोडुन वाहत असल्याने बऱ्याच गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे तालुकामुख्यालयाशी त्या गांवाचा संपर्क तुटला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेती खरडुन गेली आहे.  गुराढोरांचे बळी गेले आहे. काही ठिकाणी मनुष्यहानी सुध्दा झालेली आहे. एका बाजुला घाटावर काही ठिकाणी अपेक्षीत पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंचेत असतांना अतिवृष्टीने घाटाखाली प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यंत्रणेव्दारे वस्तुनष्ठि सर्व्हे होऊन मायबाप शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ मिळावी. अतिपावसामुळे दुबारचे संकट ओढावणार आहे. त्यासाठी बि बियाणे व खताची उपलब्धता व्हावी. शेतकऱ्यांना मदतीसाठी तात्काळ पाऊले उचलावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
   

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, उपजिल्हाप्रमुख  आशिष रहाटे, सदानंद माळी, लखन गाडेकर, निंबाजी पांडव , किशोर गारोळे, आकाश घोडे, गजानन जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.