वीज कनेक्शन तीन दिवसांत न जोडल्यास रास्ता रोको!

आमदार सौ. श्वेताताई महाले यांचा इशारा...
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आघाडी सरकारच्या तालिबानी फतव्यामुळे तोडलेले वीज कनेक्शन तीन दिवसांत न जोडल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात करण्यात आलेल्या धरणे आंदोलनादरम्यान दिला.

आज, २६ नोव्हेंबरला संविधान दिनी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चातर्फे विविध मागण्यांसाठी चिखलीतील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.  धरणे आंदोलनाची सुरुवातच संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून व संविधानाचे वाचन करून झाली. आजच्याच दिवशी म्हणजे 26/11 च्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहिली.

सरकार लाखो तोंडातील घास हिसकावून घेतेय -आ. सौ. श्वेताताई महाले पाटील
आमदार सौ. श्वेताताई महाले यावेळी म्हणाल्या, की  शेतकऱ्यांनी पिकविलेल्या प्रत्येक दाण्यावर कुणाचे तरी नाव लिहिलेले आहे. शेतकरी जरी धान्य पिकवत असला तरी त्याने पिकविलेल्या अन्‍नाने जनतेचे पोट भरते. शेतकऱ्यांनी पिकविलेच नाही पोटही भरणार नाही. नैसर्गिक आपत्ती व सुलतानी संकटाने अगोदरच शेतकरी हैराण झालेला आहे. अतिवृष्टीची मदत नाही की पिकविम्याची भरपाई नाही. त्यातच रब्बीचा हंगाम सुरू होताच या आघाडी सरकारने कृषी पंपाचे वीज कनेक्शन कट करण्याचा अघोरी प्रकार सुरू केला आहे. वीज कनेक्शन कट केल्याने शेती पिकणार नाही पर्यायाने धान्य पिकणार नाही. त्यामुळे हे आघाडी सरकार वीज कनेक्शन कट करून लाखो करोडो लोकांच्या तोंडातील घास हिरावून घेत असल्याचे शरसंधान आमदार सौ. महाले पाटील यांनी साधले. दोनच दिवसांत चिखली तालुक्‍यातील 73 डीपी बंद करून 740 कृषी पंप बंद केले. धाड उपविभागात 42 डीपी बंद केल्या. त्यामुळे त्यावरील 397 कृषी पंप बंद झाले. म्हणजेच चिखली विधानसभा मतदारसंघात 115 डीपी बंद तर 1137 कृषी पंप बंद झाले. संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात 763 डीपी बंद करून त्यावरील 6300 कृषि पंप बंद केले, असेही आ. महाले पाटील यांनी सांगितले. यावेळी मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी श्री. जायभाये यांनी मंडपात येऊन स्वीकारले. यावेळी ज्‍येष्ठ नेते सुरेशअप्पा खबुतरे, ह. भ. प. प्रकाश महाराज जवंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, भाजपा शहर अध्यक्ष पंडित देशमुख, सभापती सौ. सिंधुताई तायडे, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शेख अनिस, चक्रधर लांडे, पंजाबराव धनवे , संतोष काळे, बबनराव राऊत यांचीही समयोचित भाषणे झाली.

महाराष्ट्रात पोलिटिकल कोरोना...
विदर्भातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हिवाळ्यात नागपूर येथे अधिवेशन घेण्यात येते. परंतु हे आघाडी सरकार आल्यापासून विदर्भात अधिवेशन होऊ नये असा प्रयत्न सरकारकडून होत आहे. यावेळचे अधिवेशनसुद्धा कोरोना कमी झाल्याने नागपूर अधिवेशन ठरलेले असताना ते रद्द करून मुंबईतच घेण्याचा घाट या सरकारने घालून विदर्भावर अन्याय करीत आहे. यासाठी कोरोनाचे कारण सांगितले जात आहे. परंतु नागपूर पेक्षा मुंबईत कोरोना जास्त असताना नागपूरचे अधिवेशन रद्द करून मुंबईत घेणे म्हणजे आणि तेसुद्धा कोरोनाचे कारण दाखविणे म्हणजे हा पॉलिटिकल कोरोना असल्याचा आरोपदेखील आ. सौ श्वेताताई महाले यांनी केला.

आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग
किसान आघाडी तालुका अध्यक्ष राजेश अंभोरे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र कलंत्री, माजी पंचायत समिती सदस्य राधताई कापसे,  शहर अध्यक्ष सागर पुरोहित, दिगंबर जाधव, बळीराम काळे, सभापती विजय नकवाल, सुभाष अप्पा झगडे, गोविंद देव्हडे, शाहिद पटेल, विनोद सीताफळे, विकास काका डाळिंबकर, सतीश शिंदे, निताताई सोळंकी तालुका महिला किसान आघाडी अध्यक्ष, सुधाकर सुरडकर तालुका उपाध्यक्ष, अॅड. एस. सदार, सुधाकर मोरे, राजेंद्र सदावर्ते, रामधन कोल्हे, आत्माराम तुळशिराम मोरे, उध्दवराव पवार, ज्ञानेश्वर सवडे, शिवाजी बाहेकर, रमेश इंगळे, कैलास सपकाळ, रवींद्र खोंडे, राजकुमार राठी, डिगांबर राऊत, महादेव ठाकरे, सतिश जगताप, अशोक हातागळे, किशोर जामदार, हरिभाऊ परिहार, अनंतकुमार सोळंकी, संजय अतार, गणेश बोरकर, दीपक शेळके, सुनिल शेळके, सुभाष सोळंकी, गजानन सोळंकी, सतिश शिंदे, राम जाधव, अंकुश तायडे, यश टिपारे, शैलेश सोनुने, अनिल सपकाळ, बाळासाहेब पवार, माणिकराव खरात, अनंता सोळंकी,  सुनिल शेळके, प्रकाश लाडे, गजानन दुधाळे, नविनचंद्र बेलोकर, गजानन काळे, सनदकुमार बेलोकर, सुरेश यंगड, संजय पाटील, किशोर कापसे, विकास डाळीमकर, ज्ञानेश्वर पवार, शिवशंकर सुरडकर, पुरुषोत्तम जाधव, एकनाथ घुबे, ज्ञानेश्वर घुबे, ज्ञानेश्वर देशमुख, प्रशांत पाखरे, अनुप महाजन, तेजराव सोनुने, गजानन दुधाळे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, अंबादास घाडगे, सुनिल जुमडे, डिगांबर देशमाने, पृथ्वीराज काळे, सिताराम खराडे, शिवाजी सावळे, विशाल हाडोळे, गोपाल हाडोळे, अरुण शेळके, श्रीराम रसाळ, समाधान शेळके, ज्ञानेश्वर भगवान मोरे, ज्ञानेश्वर इंगळे, बबनराव राउत, पुरुषोउत्तम जाधव, उध्दव सोळंके, गोपाल हाडोळे, विनोद वानखेडे, बळीराम काळे, कृष्णा शेळके, अशोक पाटील यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.