मी वाचवा वाचवा म्हणत होतो, राहुल बोंद्रे माझ्या पप्पांना मारण्यासाठी त्यांच्या मागे पळत होते! श्याम वाकदकरांच्या मुलाने सांगितलं त्याच्यासमोर काय घडलं... पहा व्हिडिओ..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "माझ्या पप्पांना ते मारहाण करीत असल्याने ते पुढे पळत होते,राहुल बोंद्रे त्यांना मारायला त्यांच्या मागे पळत होते, त्यांच्या मागे मी माझ्या पप्पांना वाचवा वाचवा म्हणून पळत होतो..पण पोलीस येईपर्यंत पप्पांना वाचवायला कुणीच आल नाही.." श्याम वाकदकर यांचा मुलगा हर्षल श्याम वाकदकर याचे हे शब्द! काल त्याचा दहाव्या वर्गाचा सायन्स चा पेपर होता,त्याचे वडील त्याला सोडायला आले होते.त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी हर्षदच्या वडिलांना मारहाण केली. आज हर्षलने माध्यमांसमोर येत त्याच्या डोळ्यादेखत जे घडलं ते सांगितलं...!

"राहुल बोंद्रेंनी माझ्या पप्पांच्या खांद्यावर हात ठेवला, तू माझ्या वडिलांच्या विरोधात काय पोस्ट केली असे विचारले, त्यावर मी तुमच्या वडिलांच्या विरोधात काहीही पोस्ट केली नाही ,असे माझ्या पप्पांनी त्यांना सांगितले. पण तरीही राहुल बोंद्रेंनी माझ्या पप्पांना मारहाण करायला सुरुवात केली, राहुल बोंद्रे यांच्यासोबत त्याचे साथीदार होते. तेही मारहाण करू लागल्याने माझे पप्पा पळायला लागले. राहुल बोंद्रे पप्पांना मारायला त्यांच्या मागे आणि मी वाचवा वाचवा म्हणत त्यांच्या मागे पळत होतो. त्या सगळ्यांनी माझ्या पप्पांना पुन्हा पकडले, त्यांचे शर्ट फाडले. गळ्यातील चैन आणि पाकीट व त्यातील ५ हजार रुपये त्या लोकांनी लांबवले. माझ्या पप्पांना त्यांनी दगड मारायचा प्रयत्न केला पण तो दगड पप्पांच्या पायावर पडला. शेवटी पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजल्यानंतर ते सगळे लोक तिथून निघून गेले". असे हर्षदने सांगितले. या प्रकारानंतर मी पेपर द्यायला उशिरा सेंटरवर पोहचलो मात्र माझे मन पेपर मध्ये लागलेच नाही, आता पुढचे पेपर कसे जातील याचे मला टेन्शन आहे असेही हर्षलने माध्यमांसमोर सांगितले.

  पहा पूर्ण व्हिडिओ... <a href=https://youtube.com/embed/TQ8Lg-RMTMM?autoplay=1&mute=1><img src=https://img.youtube.com/vi/TQ8Lg-RMTMM/hqdefault.jpg alt=""><span><div class="youtube_play"></div></span></a>" style="border: 0px; overflow: hidden"" style="border: 0px; overflow: hidden;" width="640">