मी तरी टॉवेल बनियनवर होतो; हा तर रानडुकरासारखा दिसत होता! अनिल परबांवर आ. गायकवाडांची बोचणारी टीका...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याच्या आरोपावरून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ महाराष्ट्रभर तुफान वायरल झाला होता.त्यानंतर विधिमंडळात देखील हे प्रकरण चांगलेच गाजले होते. याप्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी संजय गायकवाड यांचे विरोधात बनियन आणि टॉवेल घालून आंदोलन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार गायकवाड यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या आंदोलनाची खिल्ली उडवली.. आता यावर आ.गायकवाड यांनी केलेले विधानही तुफान चर्चेत आले आहे. अनिल परब रानडुकरा सारखे दिसत होते असा खोचक टोमणा आ.गायकवाड यांनी लगावला..
  विरोधी पक्षांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर केलेल्या आंदोलनाबाबत आमदार गायकवाड यांना माध्यमांनी विचारणा केली. त्यावेळी आ.गायकवाड म्हणाले की,२००४ मध्ये उद्धव ठाकरे लोणारला आले होते. त्यावेळी चड्डी बनियान वरील आदित्यला मी माझ्या खांद्यावर घेऊन गेलो होतो. कारण उद्धव ठाकरेंना वर चढता येत नव्हते. अनिल परब मंत्री असताना मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा ते माझ्यासारखेच होते. मी बनियन तरी घातली होती ते बनियानवर सुद्धा नव्हते. मी तरी माणसासारखा दिसत होतो मात्र ते नाश्ता करताना रानडुकरासारखा दिसत होते असा खोचक टोमणा आ. गायकवाड यांनी लगावला.