"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर!
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया..!"संदीप शेळकेंच्या व्हिजनला मतदारांची पसंती!
शेळकेंच्या मुद्द्याच्या प्रचाराने मतदारराजा झालाय प्रभावित...! मतपेटीतून चित्र दिसणार?
"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर!
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया..!! याच शब्दात संदीप शेळके यांच्या वन बुलडाणा मिशन या चळवळीच अन् त्यांच्या राजकीय प्रवासाच वर्णन करावे लागेल..संदीप शेळके यांना प्रचारात मिळालेला प्रतिसाद मतपेटीत उमटला तर मात्र भल्या भल्यांची झोप उडण्याची चिन्हे आहेत.
ना कुणावर टीकाटिप्पणी, ना भपकेबाजी.. अतिशय मुद्देसुद अन् कामाचं बोलणारा माणूस म्हणजे संदीपदादा..तेवढेच शांत , संयमी पण विचारांची स्पष्टता, हाती घेतलेला लढा पूर्णत्वास नेणाऱ्या ध्येयवेड्या संदिपदादांची कहानीच न्यारी आहे..कुठलाही राजकीय पक्ष नाही, राजकीय गॉडफादर नाही..अशा स्थितीत लोकसभेसारख्या मोठ्या रिंगणात उतरणाऱ्याचे धाडस करणाऱ्या संदिपदादांचे सुरुवातीच्या काळात अनेकांना आश्चर्यच वाटले होते..मात्र एकदा घेतलेला निर्णय मागे घेतील ते संदीपदादा कसले? ते निर्णयावर ठाम राहिले अन् नुसते ठाम राहिले असे नाही तर प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवणारा लढा त्यांनी उभा केला. तो लढा होता जिल्ह्याच्या विकासाच्या चळवळीचा..
जनतेचा जाहीरनामा, श्रीराम वंदना यात्रा, परिवर्तन रथयात्रा, बूथ मेळावा असे राजकारणात कसलेल्या पैलवानासारखे कार्यक्रम त्यांनी लावले. ज्याची जिल्हाभर सकारात्मक चर्चा झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी संदीपदादांनी केलेल्या भाषणाची तर संपूर्ण मतदारसंघात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक कशासाठी, जिल्ह्याचे व्हिजन काय या सगळ्या बाबी त्यांनी भाषणातून स्पष्ट केल्या. विशेष म्हणजे उमेदवाराचे असे भाषण पब्लिक ने कधी ऐकलेच नाही. टीका टिप्पणी, याने काय केले नाही, अमका तसा, फलाना तसा असा एकंदरीत सर्वच उमेदवारांच्या भाषणाचा असाच सूर असल्याने संदीप शेळकेंचे वेगळेपण जनमानसात ठसले..प्रचारात देखील शेळके यांच्या रोड शो कॉर्नर बैठकांना भक्कम गर्दी होतांना दिसली..या गर्दीपर्यंत संदीप शेळके यांनी त्यांचे व्हिजन पोहचवले. सिंचनाची सोय, पांधन रस्ते, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, रोजगार, पर्यटन , महिला सक्षमीकरण, शेतमाल प्रकिया उद्योग या मुद्द्यांवर निवडणूक लढविणाऱ्या शेळकेंना संपूर्ण मतदारसंघात जाम प्रतिसाद मिळाला.. आता प्रत्यक्ष होणाऱ्या मतदानात याचे चित्र उमटेल अशी अपेक्षा संदीप दादांच्या चाहत्यांना, समर्थकांना, हितचिंतकांना अन् जिल्हा विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आम् पब्लिकला आहे..जे व्हायचं ते होईल पण दादांनी केला तो माहौल राजकारण करू पाहणाऱ्या प्रत्येकाने अभ्यासाला पाहिजेच...