देवाची शपथ...! शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पोहोचणार; शिवनी आरमाळ येथील तरुणांनी मंदिरात दिली रविकांत तुपकरांना ग्वाही!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देवाची शपथ घेऊन सांगतो भाऊ आता शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीच्या संसदेत पोहोचणार आहे. आम्ही सर्व तन-मन-धनाने तुमच्या सोबत आहोत. अशी काही शिवनी आरमाळ येथील तरुणांनी रविकांत तुपकरांना दिली.एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमानिमित्ताने रविकांत तुपकरांनी शिवनी अरमाळ येथे भेट दिली. सर्वसामान्यांसोबत पंगतीत बसून रविकांत तुपकरांनी भोजन केले. यावेळी तरुण व सर्व सामान्य जनतेने तुपकरांना मोठा गराडा घातला होता.  
  रविकांत तुपकरांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या दुसाकीवर बसून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव गावात काही घरी भेटी दिल्या. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांसह ते गावातील मंदिरावर पोहोचले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सर्वांशी संवाद साधला असता. देवाची शपथ घेऊन सांगतो भाऊ आता शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीच्या संसदेत पोहोचणार आहे. आम्ही सर्व तन-मन-धनाने तुमच्या सोबत आहोत. अशी ग्वाही येथील तरुणांनी रविकांत तुपकरांना दिली.