नरेंद्र खेडकरांचा अर्ज भरण्यासाठी जमला विराट जनसागर! आदित्य ठाकरे, सुषमा अंधारें, रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर ओढले ताशेरे! महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नरेंद्र खेडेकरांना विजयी करण्याचे आवाहन! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज,४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खेडेकर यांनी जंगी शक्तिप्रदर्शन घडवले. जाहीर सभा आणि त्यानंतर झालेल्या रॅलीला प्रचंड गर्दी जमली, विशेष म्हणजे रणरणत्या उन्हात स्वतः आदित्य ठाकरे, रोहित पवार , सुषमा अंधारे, अंबादास दानवे ही नेतेमंडळी रॅलीत सहभागी झाली.स्वतः आदित्य ठाकरे रॅलीत सहभागी झाल्याने बुलडाणेकर जनतेनेही आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी गर्दी केली. थोडक्यात काय तर तळपत्या उन्हात नरेंद्र खेडेकरांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी घाम गाळल्याचे चित्र दिसले, जे पाहून उमेदवार नरेंद्र खेडेकर नक्कीच सुखावले असतील. दरम्यान यावेळी झालेल्या सभेत आदित्य ठाकरे विरोधकांवर चांगलेच तुटून पडले. ज्यांनी गद्दारी केली त्यांना याच मातीत गाडा, नरेंद्र खेडेकरांना दिल्लीत पाठवा असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.
 Advt.👆
देशात बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी संकटात आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकही नवा उद्योग नाही. आता यावर राजकीय परिवर्तन हेच उत्तर असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सुषमा अंधारेंनी त्यांच्या खास शैलीत जिल्ह्यातील खासदार आमदारांचा समाचार घेतला. तुम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेले म्हणता मग लोणार येथील धार बंद केली होती तेव्हा तुम्ही का समोर आला नाहीत? तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व असा सवाल त्यांनी केला. यावेळी अंधारे यांनी आमदार गायकवाड यांच्या आग्यामोहळ वक्तव्याचा देखील विशेष शैलीत समाचार घेतला. कुठे काही असू द्या बुलडाणा जिल्ह्यात नरेंद्रची लाट आहे, ही लाट उष्णतेपेक्षाही भयंकर आहे असे म्हणत खेडेकर यांच्या विजयासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. रोहित पवार यांनी बोलतांना आता परिवर्तन केवळ महाविकास आघाडीचं करू शकत असल्याचे सांगितले. 
आदित्य ठाकरे लोकांत मिसळले..
Advt.👆
  आदित्य ठाकरे भाषण करीत असताना लोकांशी संवाद साधत होते. अनेकदा मध्येच भाषण थांबवून त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यासाठी स्टेजवरून आदित्य ठाकरे खाली उतरले..ठाकरेंची ही अनोखी शैली लोकांना चांगलीच भावली..
आता काय मातोश्री नावावर करून द्यायची होती का? 
नरेंद्र खेडेकर यांनी बोलतांना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. खासदार म्हणतात तिकडे आमचा सन्मान होत नव्हता, उद्धवसाहेब भेटत नव्हते..मग चार चेळा आमदारकी, ३ वेळा खासदारकी भेटल्याशिवाय भेटली का? आता का मातोश्री तुमच्या नावावर करून द्यायची होती का? असा परखड सवाल खेडेकर यांनी केला.