राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्षपदी ऋषिकेश म्हस्के पाटील! 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव तथा शेतकरी चळवळीतील युवा नेतृत्व ऋषीकेश बबनराव म्हस्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेल बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष महादेवजी बालगुडे, प्रदेश सह- अध्यक्ष मोहसीनजी आझाद शेख तथा उपाध्यक्ष योगेश सावंत यांनी ही नियुक्ती केली. 
आमदार रोहित पवार यांचे विश्वासु चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील ऋषिकेश म्हस्के गेल्या अकरा वर्षांपासून शेतकरी, विद्यार्थी, सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. खा. शरद पवार यांच्या विचारांनी प्रभावित होऊन युवकांच्या रोजगारासाठी तथा कल्याणासाठी अहोरात्र झटणारे कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. तेंव्हापासून पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांचे शिक्षण MBA (मार्केटिंग अँड फायनान्स) तथा Bsc (Agril), बायोटेक्नॉलॉजीपर्यंत झालेले आहे.एखाद्या मोठया पॅकेजच्या नोकरीच्या मागे न धावता त्यांनी स्वतःला शेतकरी चळवळीत झोकून दिले आहे. शेतकरी कर्जमाफी, पीककर्ज, नुकसान भरपाई यासह इतर मुद्द्यांवर त्यांनी विविध आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळवुन देण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले आहे. रास्ता रोको, निदर्शने, धरणे, उपोषण यामाध्यमातून त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती, फी माफी, बेरोजगारी, महिलांचे तथा युवकांचे रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. 
ऋषिकेश म्हस्के हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव आहेत. त्यांनी या पदाला योग्य न्याय दिला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आता त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने सोशल मीडिया सेलच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ते कार्यरत राहतील, असा विश्वास मा.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सदर नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. खा. शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खा.सुप्रिया सुळे,आ.जितेंद्रजी आव्हाड,कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष आमदार रोहितदादा पवार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष महादेवजी बालगुडे, प्रदेश सह- अध्यक्ष मोहसीनजी आझाद शेख तथा उपाध्यक्ष योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 
नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.   
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तथा आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांची पुरोगामी विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी मी झोकून काम करणार आहे.जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असेल. माझे मार्गदर्शक आ.रोहितदादा पवार तथा सर्वच वरिष्ठ नेते यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवील. येत्या काळात जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पक्षाचा विचार पेरण्यासाठी अविरत परिश्रम करणार आहे अशी प्रतिक्रिया ऋषिकेश म्हस्के यांनी दिली.