हिंदू खाटीक समाजाचा आ. श्वेताताई महाले यांना जाहीर पाठिंबा! दादासाहेब गोतरकर म्हणाले, हिदू खाटीक समाज पूर्ण शक्तीने श्वेताताईंसोबत....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील महायुती सरकारने मागास असलेल्या हिंदू खाटीक समाजाच्या प्रगतीसाठी हिंदू खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले आहे. याची जाणीव ठेवून हिंदू खाटीक समाजातर्फे महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ. श्वेताताई महाले यांना या निवडणुकीत हिंदू खाटीक समाजाच्या वतीने आपला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पाठिंबाचे पत्र आमदार श्वेताताई महाले यांना ३१ ऑक्टोबर रोजी सुपूर्द केले. 

  राज्यातील प्रत्येक समाज घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महायुती सरकारने हिंदू खाटीक समाजाची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी पूर्ण केली. याबद्दल हिंदू खाटीक समाजामध्ये समाधान व आनंद व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले यांची हिंदू खाटीक समाजाचे राष्ट्रीय मुख्य संरक्षक दादासाहेब उपाख्य विश्वनाथ गोतरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ३१ ऑक्टोबर रोजी भेट घेतली. या भेटीमध्ये समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल महायुती शासनाचे व या विषयाचा पाठपुरावा केल्याबद्दल आ. श्वेताताई महाले यांचे हिंदू खाटीक समाजातर्फे आभार मानण्यात आले. समाजाच्या वतीने आमदार महाले यांना पाठिंबा जाहीर करणारे पत्र देखील शिष्टमंडळाने श्वेता ताई महाले यांना सादर केले. याप्रसंगी दादासाहेब गोतरकर यांच्यासह विश्वास पवार, डॉ. साहेबराव पवार, अनंता गोतरकर, आत्माराम खिरडकर, अक्षय रावरकर, तुकाराम खिरडकर, सुनील माकोडे, रामदास खिरडकर, विलास घन हे पदाधिकारी उपस्थित होते.