मुलीला मारहाण करणाऱ्या जवायाला समजून सांगण्यासाठी गेले, पण जावायाने नको तेच केलं..! चिखली तालुक्यातील ईसोली येथील घटना..नेमके प्रकरण काय? बातमीत वाचा

 

अमडापुर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अमडापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या इसोली गावातून आजूबाजूच्या गवाखेड्यात एक खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. संशयातून नवरा सतत मारहाण करतो असे पिडीतीने तिच्या वडिलांना सांगितले होते, त्यामुळे जवायाची समजूत घालण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांनाच शिवीगाळ करण्यात आली. इतकेच नाही तर, ईव्हायाने सुद्धा काडीने मारहाण करून जखमी केले. मध्ये मुलगी आली तर तिलाही जावयाने बदडले अशी तक्रार मुलीचे वडील लक्ष्मण ढोमने यांनी अमडापुर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Advt. 👆
घटना शनिवारी, ६ एप्रिलला घडली होती. लक्ष्मण ढोमणे असे पीडित मुलीच्या वडिलांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारनुसार त्यांचे जावई श्याम भास्कर शेळके, ईव्हाही भास्कर मोतीराम शेळके, विहीन उषा शेळके या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल रोजी लक्ष्मण ढोमने यांना मुलगी धनश्री हिचा फोन आला. पती श्याम शेळके हे संशयातून नेहमी मारहाण करत आहेत. तुम्ही घरी या असे तिने वडिलांना सांगितले. त्यांनतर ६ एप्रिलला ढोमने हे जावायाची समजूत घालण्यासाठी मुलीच्या घरी इसोली येथे गेले. जावई श्याम शेळके याची समजूत घालत असतानाच त्यांना शिवीगाळ झाली. इतकचं नाही तर ईवाही भास्कर शेळके यांनी काठी हातात घेवुन वार केले. मुलगी धनश्री ही मध्ये आली असता तिलाही जावयाने चापटा बुक्यांनी मारहाण केली. मुलीची सासू उषा शेळके हिने ही तिचे केस पकडून शिवीगाळ केली. त्यांनतर लक्ष्मण ढोमने यांना घरातून काढून दिले. असे तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास अमडापुर पोलीस करत आहेत.