संदीप शेळकेंना वाढते पाठबळ ; युवा टायगर सेनेने दिला पाठिंबा !
Apr 22, 2024, 21:00 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अपक्ष उमेदवार तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना दिवसेंदिवस विविध संघटनेचा पाठिंबा मिळत आहे. आज युवा टायगर सेनेने शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकातून त्यांनी ही माहिती दिली.
विकासाचे व्हिजन मांडून निवडणूक लढवत असल्याने संदीप शेळकेंची लोकप्रियता वाढली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात त्यांना विविध संघटनेकडून पाठिंबा मिळाला. आज युवा टायगर सेनेने संदीप शेळके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लहू, शाहू , फुले आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर वन बुलढाणा मिशन ही चळवळ कार्यरत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपक्ष उमेदवार संदीप शेळके निवडणूक लढवत आहेत. युवा टायगर सेनेच्या सर्व सदस्यांनी संदीप शेळकेंना पाठिंबा जाहीर करण्याचे ठरविले असून मातंग समाजाच्या सर्व मांगण्या पूर्ण करण्याचे आश्वासन शेळके यांनी दिले असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Advt