जिजाऊंच्या लेकींसाठी आनंदाची बातमी! खासदार प्रतापराव जाधवांकडून जिल्ह्यातील महिला बचत गटांना मोठी भेट; बचत गटांकडून उत्पादित माल कुठे विकायचा? प्रश्नच सुटला!
मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, चिखलीत आज होणार महिला बचत गटांच्या विक्री केंद्राचा भूमिपूजन सोहळा..
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी महिला बचत गटांना मोठी भेट दिली आहे. आज, १३ ऑक्टोबरला जिल्ह्यातल्या ४ तालुक्यांत महिला बचत गटांच्या विक्री केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी यासाठी वरिष्ठ पातळीवर अथक प्रयत्न केले होते.
मेहकर, लोणार, सिंदखेडराजा आणि चिखली येथे महिला बचत गटांच्या विक्री केंद्राची उभारणी होणार आहे. बचत गटांकडून उत्पादित होणाऱ्या मालाला मोठी बाजारपेठच यानिमित्ताने खा.जाधव यांनी उपलब्ध करून दिली आहे. मेहकर येथे पोलीस स्टेशन जवळ हे विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे, सकाळी साडेदहा वाजता तेथील भूपिपजन समारंभ होणार आहे. त्यानंतर लोणार येथील विक्री केंद्राचा भूमिपूजन समारंभ साडेबारा वाजता होणार आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्याला आमदार संजय रायमुलकर देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २:२० वाजता सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयाजवळ खा. प्रतापराव जाधवांच्या हस्ते.विक्री केंद्राचा भूमिपूजन सोहळा होईल, आ. डॉ राजेंद्र शिंगणे आणि माजी आ.शशिकांत खेडेकर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी साडेचारला चिखली येथील पंचायत समिती जवळ खा.जाधव यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या विक्रीकेंद्राचा भूमिपूजन सोहळा होईल. आमदार श्वेताताई महाले या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. खा. जाधव यांनी महिला बचत गटांसाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे महिला बचत गटांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.