वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! स्वाभिमानीच्या लढ्याला यश; पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात! दामुअण्णा इंगोले म्हणाले,
शेवटच्या शेतकऱ्याला पैसे मिळेपर्यंत नागपूर उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका परत घेणार नाही....
वाशीम( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दामुअण्णा इंगोले यांच्या लढ्याला यश आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी नेते दामुअण्णा इंगोले यांनी यासाठी लढा उभारला होता. पीक विम्याची अग्रीम रक्कम जमा होत असल्याने शेकडो शेतकरी दामुअण्णा इंगोले यांना फोन करून धन्यवाद देत आहेत..
पुढच्या ५ दिवसात जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही अग्रीम रक्कम जमा होणार आहे. शेवटच्या शेतकऱ्याला पैसे मिळेपर्यंत नागपूर उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका परत घेणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी कडून या आधीच जाहीर करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी किन्हीराजा इथे झालेल्या सोयाबीन परिषदेतून कंपनीला लवकर पैसे टाकण्याचा इशारा दामुअण्णा इंगोले यांनी दिला होता. त्यामुळे विमा कंपनीने स्वाभिमानीच्या आंदोलनाची धास्ती घेत आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकायला सुरवात केली आहे. या लढ्यात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनीही शेतकऱ्यांची बाजी लावून धरल्याने स्वाभिमानीने त्यांचे विशेष आभार मानले आहेत.