घरकुलाच्या खोलीवरून दोघ्या सख्या भावात जुंपली!लाठ्या - काठ्या चालल्या...प्रकरण गेले पोलिसात..!

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घरकुलाच्या एका खोलीसाठी एका सख्या भावाने दुसऱ्या सख्या भावाला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याचा घटना शेगाव तालुक्यातील वरखेड येथे उघडकीस आली आहे.
बाबूलाल रामचंद्र रताळे (४२), गणेश रामचंद्र रताळे (३५) (रा.वरखेड तालुका - शेगाव) या दोघ्या सख्या भावांमध्ये मयत आईच्या घरकुलाच्या खोलीमध्ये राहण्याच्या कारणावरून वाद झाला. ११डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान बाबूलाल याने गणेश याला घरकुलाची खोली मागितली होती. गणेश'ने खोली देण्यास नकार देवून वाद घालून शिवीगाळ केली.लाठ्या - काठ्याने मारहाण केली. ओठावर वीट मारून जखमी केले.जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार बाबूलाल रताळे यांनी शेगाव ग्रामीण पोलिसात दिली आहे.पुढील तपास पोहेकॉ अरुण मेटांगे करीत आहेत.