शेलसुरचे माजी सरपंच रवींद्र रिंढे उबाठामधून भाजपात! श्वेताताईंचे हात बळकट...
Oct 30, 2024, 12:04 IST
भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, शिवराज पाटील, सेलसुर ग्रामपंचायतचे सदस्य शेषराव बोराडे, लक्ष्मण रिंढे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश प्रसंगी रवींद्र रिंढे यांनी आपण श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात सहभागी होत असून श्वेताताईंच्या विजयासाठी शेलसुरमधून मताधिक्य आ. महाले यांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. आमदार श्वेताताई महाले यांनी देखील रवींद्र रिंढे यांचे पक्षात स्वागत केले. रिंढे यांनी उबाठाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्यामुळे शेलसुर येथून आ. श्वेताताई महाले यांची निश्चितच सरशी होईल अशी अपेक्षा भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.