मलकापूरमध्ये माजी आमदार संचेती कडाडले...याचा जाब भाजपा विचारेल!

मलकापूरमध्ये आसूड मोर्चा
 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विदर्भातील शेतकऱ्यांशी काहीच देणे घेणे नसल्यासारखे राज्‍य सरकार वागत आहे. शेतकरी संकटात असूनही सरकार झोपेचे सोंग घेतेय. येत्या अधिवेशनात सरकारला भाजपा याचा जाब विचारेल, असे प्रतिपादन माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केले.
जिल्ह्यातील ओला दुष्काळ जाहीर करण्यासह पंचनामे न करता सरसकट मदत देण्यासाठी भाजपातर्फे मलकापूरमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काल, २६ ऑक्‍टोबरला आसूड मोर्चा काढण्यात आला. गोविंद विष्णू महाजन विद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्‍यावेळी श्री. संचेती यांनी मार्गदर्शन केले. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्‍टरी २५ हजार आणि बागायतदार शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांची त्‍वरित मदत द्यावी, अशी मागणी श्री. संचेती यांनी यावेळी केली. मोर्चात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.