मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. गोंधनेंची एन्ट्री! निष्ठावंत शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंकडे उमेदवारीचा आग्रह....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दरम्यान अद्याप महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मेहकर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत उबाठा शिवसेनेला सुटणार असल्याने या मतदारसंघात खऱ्या खुऱ्या निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसैनिकांची आहे. या स्पर्धेत आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्वचाविकार तज्ञ डॉ. शिवप्रसाद गोंधने यांनी देखील उडी घेतली असून उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे..त्यांच्यासाठी जुण्या जाणत्या निष्ठावंत शिवसैनिकांनी देखील जोर लावला आहे..
 डॉ. शिवप्रसाद गोंधने हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. गेल्या ३६ वर्षांपासून ते शिवसेना वाढवण्यासाठी काम करत आहेत. कोणतेही पद न मिरविता पक्षाच्या प्रत्येक लढ्यात ते सक्रिय असतात.शिवसेनेसाठी अनेक मेळावे त्यांनी जिल्ह्यात घेतले आहेत. याआधीही त्यांनी उमेदवारी मागितली होती मात्र त्यावेळी उमेदवारी मिळाली नाही. मात्र उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज न होता त्यांनी त्या त्या निवडणुकीच्या प्रचारात झोकून देऊन काम केले होते..आता या प्रामाणिकपणाचे फळ डॉ. शिवप्रसाद गोंधने यांना मिळावे असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह आहे..जुन्या जाणत्या निष्ठावंत शिवसैनिकांनी देखील डॉ. गोंधने यांचे नाव पुढे रेटले आहे.
 प्रख्यात त्वचा विकार तज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात डॉ.शिवप्रसाद गोंधने यांच्या नावाची ओळख आहे. जिल्ह्यात अनेक गरजू रुग्णांची मोफत सेवा डॉ. गोंधने यांनी केली आहे. त्यामुळे डॉ. गोंधने या निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे....