पहिले अर्ज देवीदेवतांच्या चरणी, मगच शासन दरबारी! वारकरी वृत्तीच्या संदीप शेळकेंचा उमेदवारी अर्ज तिर्थस्थळी समर्पित, विजयासाठी कार्यकर्त्यांचे ईश्वराला साकडे..

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके कंबर कसून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात परिवर्तन रथयात्रा त्यांनी काढली. विकासाचे मुद्दे मांडून भरगच्च प्रतिसाद त्यांनी मिळवला. ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. अर्ज भरण्याच्या अगोदरच्या दिवसांत शेळके यांच्या उमेदवारी अर्जाच्या प्रती जिल्ह्यातील पवित्र धार्मिक स्थळांना पाठवण्यात येत आहे. दरम्यान, आज १ एप्रिल सोमवार रोजी कोलवड येथील भगवान शंकराच्या मंदिरात तसेच तीर्थक्षेत्र सुपो पळशी देवस्थान येथे उमेदवारी अर्जाची प्रत नेत ईश्वरचरणी समर्पित करण्यात आली. 

 यावेळी राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालती ताई शेळके यांच्यासह विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांची, तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूपो पळशी या तीर्थस्थळीही उमेदवारी अर्जाची प्रत समर्पित करण्यात आली. यावेळी वन बुलढाणा मिशनचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांच्यासह सचिन पदमे, समन्वयक उमेश पारस्कर, निरीक्षक वासुदेव वायझोडे, कृष्णा दाभाडे, श्याम वायझोडे , आदित्य भगत तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या. शेळकेंचा उमेदवारी अर्ज ईश्वरचरणी अर्पण करून त्यांच्या विजयासाठी समर्थकांनी साकडे घातले. उमेदवारी अर्जाला आशीर्वाद मिळाल्यानंतर ३ एप्रिलला संदीप शेळके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.