आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा! काँग्रेसने मांडला पोलीस ठाण्यात ठिय्या

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुलढाणा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे. थेट पक्षश्रेष्ठी विरोधात गायकवाड यांचे बरळने काँग्रेस जणांना दुखावून गेले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भावना संतप्त असून पोलीस ठाण्यात जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. 
आरक्षणाच्या कथित मुद्द्यावरून खा. राहुल गांधी यांची जीभ हासडणार्‍याला अकरा लाख रुपये देणार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी केले. अर्थात प्रसारमाध्यमांमध्ये या संदर्भातल्या बातम्या व्हायरल झाल्या नंतर काँग्रेस नेते यांनी निषेधात्मक आंदोलनाचे हत्यार उपसले.आमदार गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जयश्रीताई शेळके, संजय राठोड, प्रकाश पाटील अवचार, मिलन आंबेकर, व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत.