शेतकऱ्यांनो सेंद्रिय शेती काळाची गरज! कृषी सहाय्यक योगेश सरोदे यांनी अमडापुरच्या शेतकऱ्यांना पटवून दिले महत्व...

 

सदर कार्यशाळेमध्ये बोलताना कृषी सहायक योगेश सरोदे यांनी उपस्थित शेतकर्याना नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून देत असताना रासायनिक शेतीला सेंद्रिय शेतीकडे रूपांतरित करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी वापरावयाच्या निविष्ठा, जैविक खाते, रायझोबियम, PSB, KMB, बायोडायनामीक पद्धतीने S9 कल्चर वापरून शेणखत कुजवणे इत्यादी बाबी समजावून सांगितल्या. सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांपैकी राज्य सरकारची पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन च्या माध्यमातून शेतकरी गट स्थापन करून त्यासाठी मिळणारे अनुदानासह या मिशन ची संपूर्ण कार्यपद्धती समजावून सांगितली.

सदर कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून उपस्थित असलेले योगेश सोनुने यांनी बायोडायनामीक पद्धतीने S9 कल्चर वापरून कंपोस्ट-शेणखत कुजवण्याची प्रक्रिया याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना करून दाखवले. त्यानंतर कृषी विभागाचे श्री पवार यांनी कृषी विभागाच्या विविध योजना- रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळे, महाडीबीटी, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना इत्यादी योजनेची माहिती दिली. त्यानंतर कृषी पर्यवेक्षक श्री इंगळे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नपरिक्रिया PMFME योजना बद्दल माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना अमडापुरचे प्रगतशील शेतकरू अजय देशमुख यांनी कृषी विभाग करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
 अमडापुर चे सरपंच संजय गवई यांनी मनोगतात बोलताना कृषी विभाग व शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालय सदैव मदतीसाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली. सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच डॉ.गवई, उपसरपंच अजीज खा, गावातील प्रतिष्टीत शेतकरी महिला शेतकरी, पत्रकार कैलास देशमुख यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता आदबाने, श्री.पवणारकर, प्रवीण मालोदे, प्रवीण कांबळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा चे श्री निसार खान यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी सहायक सुषमा गवई यांनी केले.