श्वेताताईंच्या नेतृत्वावर विश्वास! जामठी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला भाजपात प्रवेश...
Oct 28, 2024, 13:38 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जामठी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
आमदार म्हणून श्वेताताईंनी केलेली विकासकामे व त्यांच्या सर्वसमावेशक धोरणावर विश्वास ठेवत जामठी येथील काँग्रेसचे कार्यकर्ते शेख मुख्तार, शेख अजीम, शेख निसार, शेख बब्बु, शेख सलीम ठेकेदार, शेख सत्तु, विजय तायडे, स्वप्नील चिंचोले,पवन तायडे, गणेश चिंचोले,राजू चिंचोले, मोहम्मद तडवी, युसुफ तडवी, रामकृष्ण तायडे, अभिषेक तायडे, ईश्वर रामेकर, अनिकेत गव्हाणे, ज्यांनी बरडे, शेरू खान, किशोर गायकवाड, शिवा गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी ऍड. सुनील देशमुख जिल्हा सचिव भाजपा, गणेश भाई जिल्हाध्यक्ष भाजपा, ऍड. मोहन पवार तालुका अध्यक्ष भाजपा, विनायक भागवंत जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, विष्णू पाटील वाघ तालुका उपाध्यक्ष भाजपा, पंजाबराव धनवे, जितेंद्र तायडे, गोपाल तायडे, गजानन पाटील माजी सरपंच आदी उपस्थित होते...