EXCLUSIVE आ.संजय गायकवाड यांचे विधान शशिकांत खेडेकरांसाठी अडचणीचे...? वाचा काय आहे प्रकरण.... नगराध्यक्ष पदावरून आ.गायकवाड यांचे विधान...
आ.संजय गायकवाड यांनी वेळोवेळी युतीची आवश्यकता अधोरेखित केली आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकात युती होणे गरजेचे आहे, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही असे आ.गायकवाड यांनी म्हटले आहे. शिवाय युतीच्या सूत्रावर बोलताना "ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार तिथे त्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार." असेही स्पष्ट केले. आ.गायकवाड यांनी म्हटल्याप्रमाणे जर महायुती झालीच तर देऊळगाव राजाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दावा करू शकते, कारण सध्या तिथे मनोज कायंदे यांच्या रूपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे जिथे ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे विधान माजी आ. शशिकांत खेडेकर यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते..कुणी एक पाऊल मागे घेतले नाही तर तिथे विधानसभा निवडणुकीप्रमाणे मैत्रीपूर्ण लढतही होऊ शकते..