EVM मधील कंट्रोल युनिट दुरुस्‍तीचे काम वेगात; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार वापर

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून जिल्ह्यात उपलब्ध मतदान यंत्रांतील नादुरुस्त कंट्रोल युनिटची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही संयंत्रे लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकात वापरण्यात येणार आहेत. मागील ९ सप्टेंबरपासून बुलडाणा शहरातील …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून जिल्ह्यात उपलब्ध मतदान यंत्रांतील नादुरुस्त कंट्रोल युनिटची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही संयंत्रे लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकात वापरण्यात येणार आहेत.

मागील ९ सप्टेंबरपासून बुलडाणा शहरातील अल्पबचत भवनात २२८० कंट्रोल युनिटच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले. बंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ७ तज्‍ज्ञ यासाठी बुलडाण्यात डेरे दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उप जिल्हाधिकारी गौरी सावंत, भूषण अहिरे, तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली २२८० युनिटच्या दुरुस्तीचे सुसज्ज नियोजन करण्यात आले.

अव्वल कारकून प्रकाश डब्बे यांच्यासह किशोर पाटील, भगवान सुरशे, राजू पवार आदी कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, आज १९ सप्टेंबरअखेर ४६० कंट्रोल युनिटची दुरुस्ती करण्यात आली आहे. येणाऱ्या ११ नगर परिषदा, नगरपंचायत, जिल्हा परिषद, १३ पंचायत समित्यांच्या निवडणुकांत या युनिटचा वापर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

यूपीची दुसरी खेप रवाना
दरम्यान, उत्तरप्रदेश राज्यातील इटावाकडे जिल्ह्यातील बॅलेट युनिटची आणखी एक खेप आज, १९ सप्‍टेंबरला रवाना झाली आहे. भूमी संरक्षण अधिकारी प्रमोद कुमार यांच्या मार्गदर्शनात आलेल्या पथकाने कडक बंदोबस्तात ही संयंत्रे नेली. यूपीच्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा वापर करण्यात येणार आहे.