निवडणूक अपडेट! चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत  ४ जागा महाविकास आघाडीला!  जय बोंद्रे, निरज चौधरी, मनोज लाहुडकर, राम खेडेकर झाले संचालक

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. पहिला निकाल जरी भाजपच्या बाजूने आला तरी त्यानंतर मात्र महाविकास आघाडीने अजून भाजपला विजयाची संधी दिली नाही. 
 

व्यापारी मतदारसंघातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. मनोज लाहुडकर, राम खेडेकर दोघेही विजयी झाले सहकार पॅनलचे ग्रामपंचायत मतदार संघातील दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. सध्या ७ वाजेच्या सुमारास हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीला ४ तर भाजपला १ जागा मिळाली आहे.