ELECTION SPECIAL गोंधळ मांडला.. आता डॉ.सुनील कायंदे मनगटावर बांधणार घड्याळ? हालचाली जोरात.....!

 डॉ.शशिकांत खेडेकर म्हणतात, पक्षनेतृत्वावर...
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बहुप्रतिक्षित घडामोडी काल,१९ ऑक्टोबरला सिंदखेड राजा मतदारसंघात घडल्या..आज फुंकणार..उद्या फुंकणार म्हणता म्हणता डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी अखेर काल तुतारी फुंकलीच...त्यामुळे आता डॉ.राजेंद्र शिंगणे हे महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे निश्चित आहे.. महाविकास आघाडीतील घटक पक्ष्यांच्या काही नेत्यांकडून विरोध होत असला तरी तो मोडून काढायला डॉ.शिंगणे यांना फार वेळ लागणार नाही...मात्र डॉ.शिंगणे यांच्या निर्णयामुळे आता महायुतीत हालचालींना वेग आला आहे.. महायुतीत ठरलेल्या सूत्रानुसार या जागेवर पहिला अधिकार अजित पवार गटाचा आहे...खरेतर अजित पवार गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याने ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटावी अशी त्यांची अपेक्षा आहे...मात्र घडणाऱ्या वेगवान घडामोडी पाहता काय होईल हे निश्चित सांगता येत नाही..त्यातच आता भाजपचे डॉ.सुनील कायंदे मनगटावर घड्याळ बांधण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे..जागा नाही भाजपला सुटत तर अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्याचा डॉ. कायंदे यांचा मानस आहे..एकंदरीत आता महायुतीत गोंधळाची स्थिती आहे..

 डॉ.शिंगणे महाविकास आघाडीत गेल्यानंतर आता महायुतीतील इच्छुकांच्या महत्त्वकांक्षा उफाळून वर आल्या आहेत. भाजप ही जागा स्वतःकडे मागत आहे..त्याहीपुढे जाऊन भाजपच्या डॉ.सुनील कायंदे यांनी मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटात जाऊन मनगटावर घड्याळ बांधण्याची तयारी चालवली आहे. मात्र यात त्यांना कितपत यश येईल हे सांगणे सध्यातरी कठीण आहे.

अजित पवार गटाकडून नव्याने इच्छुकांच्या शर्यतीत उतरलेले ॲड. नाझेर काझी जागा ताकदीने लढवण्याचा दावा करत असले तरी त्यांच्या "हेतु" वर खुद्द महायुतीतील नेते खाजगीत संशय व्यक्त करीत आहेत,त्यामुळे काझी यांचा विचार सध्या होईल असे वाटत नाही..मात्र मुस्लिम चेहरा असल्याने दुसरा कुठला तरी शब्द अजित पवारांकडून घ्यायचा असा होरा काझी यांचा असू शकतो. त्यामुळे एकतर जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडणे किंवा मित्रपक्ष शिवसेना किंवा भाजपच्या इच्छुक उमेदवाराला घड्याळ देऊन लढवणे असे पर्याय अजित पवार यांच्याकडे आहेत..आता यावर महायुतीच्या एकत्रित बैठकीतच निर्णय होणार आहे..

डॉ.शशिकांत खेडेकर म्हणतात....
 दरम्यान डॉ.शशिकांत खेडेकर यांनी त्यांच्या संयमी स्वभावाप्रमाणे सध्या घडणाऱ्या घडामोडींवर संयमी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
उमेदवारीसाठी कुणी प्रयत्न करणे हे काही गैर नाही..गेल्या अनेक वर्षांपासून मी मतदार संघात जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.. केवळ निवडणुका आल्या म्हणून मी मैदानात उतरलो असे नाही.. ८० टक्के समाजकारण आणि २०टक्के राजकारण ही आम्हाला शिकवण आहे..त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत.. पक्ष नेतृत्वावर आपला १०० टक्के विश्वास आहे..जे होईल ते चांगले होईल असा विश्वास असल्याचे डॉ.शशिकांत खेडेकर "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना म्हणाले..