अविकसित जिह्यातील माता भगिनिंचे आर्थिक सक्षमीकरण हेच ध्येय! खामगावातील जंगी महिला मेळाव्यात संदीप शेळकेंचे प्रतिपादन! महिलांच्या चौफेर प्रगतीसाठी जाहीर केला जाहीरनामा.
Mar 2, 2024, 08:22 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यकर्ते व आजवरच्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बुलडाणा जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. याला बुलडाणा मतदार संघातील लाखो माता भगिनीसुद्धा अपवाद नाही.यामुळे जिल्ह्याच्या सर्वकश विकासाबरोबरच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हेच आपले ध्येय असल्याचे आग्रही प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संस्थापक तथा शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले आहे.
खामगाव येथे काल शुक्रवारी पार पडलेल्या व उत्साही प्रतिसाद लाभलेल्या महिला मेळाव्यात संदीप दादा बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी जिल्ह्यातील निष्क्रिय लोकप्रतनिधीवर टिकेचा आसूड उगारतानाच सर्व सामान्य महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी नेमके काय करायला हवे आणि आपण काय करणार हे उलगडून सांगितले. सुवर्ण महोत्सवी वर्षातही जिल्ह्यातील महिलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार आदी अनेक प्रश्न कायम आहेत. समाजातील या महत्त्वाच्या घटकासाठी राजश्री शाहू परिवाराने अनेक योजना राबविल्या. आजवरच्या काळात महिला बचत गटांच्या ४० हजार महिलांना १५० कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिलेत. यामधून अनेक उद्योजक महिला घडल्या आहेत. त्यांच्या मालाला व उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळून देण्यासाठी आपण कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. महिला व्यवहाराबाबत पुरुषांच्या तुलनेत आधिक चोक असतात. त्यामुळे खासदार म्हणून निवडून दिल्यास महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले.
आणि...जाहीरनामा!
माता भगिनिंच्या आशीर्वादाने आपण खासदार झालो तर महिलांसाठी आपण विविध योजना उपक्रम राबविणार आहोत असे संदीप शेळके यांनी स्प केले. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता आपण महीलांसाठी महिला सुरक्षा हेल्पलाईन कार्यान्वित करणार आहोत. त्यामुळे संकटातील महिलांना तात्काळ पोलिसांची मदत मिळेल. जिजाऊंच्या नावाने महिला बचत गटांसाठी ऑनलाइन बाजारपेठ उभारण्याच्या आपला संकल्प आहे. माझ्या अनेक बहिणी जिल्ह्यातील युवती बुद्धीवान असूनही उच्च शिक्षण, आवडीचे शिक्षण, घेऊ शकत नाही. त्यामुळे सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ विद्यापीठ सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याशिवाय एम.पी. एस.सी, यू.पी. एस.सी व अन्य स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक युवतींसाठी तालुक्याच्या ठिकाणी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा माणस संदीप दादांनी यावेळी बोलून दाखविला. उच्च शिक्षण व नोकरीसाठी महानगरात गेलेल्या जिल्ह्यातील युवती व महिलांसाठी सुसज्ज हॉस्टेल उभारण्याचे आपले नियोजन आहे. महिलांच्या वैद्यकीय समस्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी महिन्यात गावोगावी जाईल. असे आपले नियोजन राहणार आहे.याशिवाय विधवा, मजूर महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना स्मार्ट कार्ड देणार आहोत. यातून त्यांना विवीध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यामुळे माताभगिनींनी आपल्या या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाठबळ देण्याचे आवाहन संदीप शेळके यांनी यावेळी केले.