जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; हरकती व आक्षेपांसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत...
Oct 8, 2025, 19:46 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार आज दि ८ ऑक्टोबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या मतदार यादीबाबत ८ ते १४ ॲाक्टोबर या कालावधीमध्ये हरकती व सुचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. याविषयी मतदार यादी पाहण्यासाठी सर्व तहसिल कार्यालयाचे नोटीस बोर्डवर, जिल्हा परिषद कार्यलय, पंचायत समिती कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने दिली.