डॉ.संजय रायमुलकर रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होतील! शिवसेना लोणार तालुकाप्रमुख भगवानराव सुलतानेंना प्रगाढ विश्वास; म्हणाले, सिद्धार्थ खरात "आऊट ऑफ रेस"....

 
  
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर- लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.संजय रायमुलकर २४ तास जनतेच्या सेवेत असणारे नेतृत्व आहेत. मेहकरच्या मातीत रमणारे आणि मातीशी नाळ जोडलेले ते सर्वसामान्यांचे लाडके आमदार आहेत. ते काही ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रगट झालेले नाहीत.. हजारो माय - माऊल्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डॉ. रायमुलकर रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील असे प्रतिपादन शिवसेनेचे लोणार तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मेहकर लोणारच्या जनतेचा खोटा पुळका आलेल्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे..
 महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक खोटे नाटे आरोप करत सुटले आहेत. सतत १५ वर्षे जनतेने आमदार रायमुलकर यांना निवडून दिले आहे. तुम्ही जनतेला वेडे समजलात का? असा सवालही सुलताने यांनी केला आहे. महाविकास आघाडीला उमेदवार देखील मुंबईवरून आणावा लागला, यावरूनच त्यांची काय अवस्था होईल हे लक्षात येते.
यावेळच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढ्या मोठ्या फरकाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होईल.. महाविकास आघाडीचे उमेदवार खरात हे तर "आऊट ऑफ रेस"आहेत असेही सुलताने यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे...