बुलडाण्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांना ५० हजार मतांच्या फरकाने पराभूत करा! खा.मुकुल वासनिक यांचे आवाहन! म्हणाले, काँग्रेसचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता जयश्रीताईंच्या विजयासाठी प्रयत्न करणार...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघात गेल्या ५ वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झाला. तानाशाही वाढली, गुंडगिरी वाढली.. सत्तेचा दुरुपयोग झाला...आता हे सर्व थांबवावं लागेल.. बुलडाण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ५०० - १००० मतांनी नाही तर ५० हजार मतांनी पराभूत करा असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांनी केले. बुलढाणा येथे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा नामांकन अर्ज आज दाखल झाला, यावेळी झालेल्या जाहीर सभेला संबोधित करतांना ते बोलत होते..

 पुढे बोलतांना मुकुल वासनिक म्हणाले की, महाविकास आघाडीचा धर्म पाहून बुलडाणा मतदारसंघातील प्रत्येक काँग्रेसचा नेता आणि कार्यकर्ता मी स्वतःची निवडणूक आहे असे समजून या निवडणुकीत काम करणार आहे.मागील निवडणुकीत ज्याला आमदार म्हणून पाठवलं त्याने, दरोडे जसे टाकतात तशा प्रकारचे राजकारण केले आहे. उद्धव ठाकरेंच्या नावाने ते निवडणूक जिंकले, मात्र शिंदेंच्या आहारी जाऊन त्यांनी पक्ष फोडण्यात शिंदेंची मदत केली अशी टीका त्यांना विद्यमान आमदारांवर नाव न घेता केली.प्रचंड असा भ्रष्टाचार बुलडाणा विधानसभा मतदारसंघात इथल्या लोकप्रतिनिधींनी केला. त्यामुळे इथली जनता या निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले...

  बुलडाणा विधानसभा मतदारसंघात आमदाराच्या माध्यमातून तानाशाही निर्माण झाली आहे, सत्तेचा दुरुपयोग करणे पैशाचा दुरुपयोग करणे असे सर्व प्रकार घडलेले आहे.आता हे सर्व थांबवावं लागेल.ज्यांनी बुलडाण्यात भ्रष्टाचार केला.ज्यांनी बुलडाण्यातील मतदारांचा अपमान केला त्यांना ५० हजार मतांच्या फरकाने पराभव करा असे आवाहन त्यांनी केले यावेळी मुकुल वासनिक यांनी जयश्रीताई शेळके यांच्या कामाचे कौतुक केले.
जयश्रीताई चांगल्या वक्त्या आहेत. लोकांचे काम त्या तळमळीने करतात.त्यामुळे जयश्रीताई निवडून आल्यानंतर चांगल्या प्रकारचे कामे होतील असेही वासनिक म्हणाले. जयश्रीताईंच्या विजयाने शाहू - फुले -आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेले सरकार सत्तेत येईल. त्यामुळे जयश्री ताईंना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन मुकुल वासनिक यांनी केले.