मरगळ आलेल्या जिल्हा काँग्रेसमध्ये "दीप" पेटवण्यासाठी सरसावले सं"दीप"! उद्या ,परवा जिल्ह्यात संवाद दौरा; जिल्हाभरात घेणार बैठका..शेळकेंच्या हाती येणार जिल्हा काँग्रेसची कमान?
वन बुलडाणा मिशनची स्थापन करून विकासाच्या मुद्द्यावर राजकीय करिअरची सुरुवात करणाऱ्या शेळकेंनी लोकसभा निवडणुकीनंतर उबाठा शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र फार काळ तिथे त्यांचे मन रमले नाही.. जिल्हा भरच नव्हे तर राज्यभर सध्या सत्तेतल्या पक्षात जाण्याचा ट्रेंड सुरू असताना संदीप शेळकेंनी मात्र वेगळा ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न केला.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मुंबईतल्या टिळक भवनात त्यांनी समर्थकांसह काँग्रेस प्रवेश केला.. काँग्रेस प्रवेश करताना त्यांना कुठला शब्द दिला हा तसा सध्या तरी तसा गुलदस्तात्यातला विषय..मात्र बाहेर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती संदीप शेळकेंच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची.. तसेही चिखलीच्या राहुल भाऊंना त्यांच्या कार्यकाळात दोन–तीन वेळा मुदतवाढ मिळाली..त्यामुळे स्व जिल्ह्यातल्या संघटनेत फेरबदल व्हावा अशी दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्षांची इच्छा असल्याचे बोलल्या जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संदीप शेळकेंचा जिल्हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.