समर्पण! आरोग्य सेवा हिच जनसेवा; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रुग्णसेवेसाठी समर्पित केला भूमिपुत्र वैद्यकीय आरोग्य कक्ष; "हा" नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असूद्या ! केव्हाही कामात येईल...

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आरोग्य सेवा हीच जनसेवा हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय आयुष , आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयात भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष स्थापना करण्यात आला असून हा मदत कक्ष काल रुग्णांच्या सेवेसाठी लोकार्पित करण्यात आला ...

केंद्रीय आयुष्य (स्वतंत्र प्रभार मंत्री ) , आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यानी गा आपल्य मंत्रिपदाचा फायदा बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना ,रुग्णांना झाला पाहिजे राज्यातील आणि देशभरातील कोणत्याही दवाखान्यामध्ये दिल्ली मुंबई हैदाबाद आणि एम्स हॉस्पीटलमध्ये ही उपचार घेता यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी हा कक्ष उभारण्याचा मनोदय व्यक्त करत जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने घेतलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात या संदर्भातील कक्षाची स्थापना करण्याचे सुतोवाच केलं होते. बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियमस्थित असलेल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष या नावाने हा कक्ष सुरू करण्यात आला आहे .
रुग्णासेवेसाठी २७ जुलैला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष लोकार्पित केला. या कक्षाच्या माध्यमातून कोणत्याही आजारातील उपचार आणि शत्रकिया संदर्भातील माहिती जिल्ह्यातील नागरीकांना सहज मिळणार आहे .शिवाय रुग्णांना मोफत, खाजगी रुग्णालयात माफक सवलतीत आणि सहज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या कक्षातुन मदत केली जाणार आहे. आरोग्य कक्षाचे प्रमुख म्हणून राजू भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल नंबर 8830330754 हा असून त्यांच्याशी रुग्णांच्या नातेवाईकनी संपर्क साधावा असे आवाहन ना.प्रतापराव जाधव यांनी भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी केले.