मतमोजणी अपडेट!ठरलं; दुसऱ्या पसंतीची मते मोजावीच लागणार; विजयासाठी ४६ हजार ९२७ मतांची गरज! लिंगाडेंना ४३ हजार ३४३ तर रणजित पाटलांना ४१००५ मते..!

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाची मतमोजणी आज,२ फेब्रुवारीच्या सकाळपासून सुरू आहे. पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे आघाडीवर आहे. दरम्यान पहिल्या पसंतीच्या सर्व मतांची मोजणी झाल्यानंतर  लिंगाडे यांना ४३ हजार ३४३ तर रणजित पाटील यांना ४१ हजार ५ मते मिळाली.

 दरम्यान एकूण झालेल्या मतदानापैकी अवैध ठरलेल्या मंतांची संख्या वजा केल्यानंतर विजयासाठी ४६ हजार ९२७ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या पसंतीत मंताचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण केला नसल्याने आता दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागणार आहेत. सर्वप्रथम ४६ हजार ९२७ मतांचा कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी होणार आहे. एकंदरीत निकाल हाती येण्यासाठी रात्री उशीर होणार आहे.