माजी आमदार चैनसुख संचेतींना कोरोना!; उपचार सुरू

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूरचे माजी आमदार आणि भाजपचे ज्‍येष्ठ नेते चैनसुख संचेती यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काल, २९ डिसेंबर रोजी सर्दी आणि ताप वाटू लागल्याने त्यांनी रॅपिड टेस्ट केली होती. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर पुढील उपचारासाठी ते काल रात्रीच नागपूरला रवाना झाले. तिथे किंग्स वे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुटूंबातील इतर सदस्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. सातत्याने जनसंपर्क सुरू असल्याने त्यांना कोविडची बाधा झाली असावी, असा त्‍यांच्या अंदाज त्यांच्या निकटवर्तीयांनी वर्तवला आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे किंग्स वे हॉस्पिटलच्या प्रशासनाने कळविले आहे.