काँग्रेसला धक्का! प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्याचा बीआरएस मध्ये प्रवेश; मुख्यमंत्री चंद्रशेखर रावांनी केले स्वागत..
महाराष्ट्र प्रदेश काँगेस सेवादलचे सरचिटणीस रवींद्र डाळीमकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. रवींद्र डाळीमकर हे मुकुल वासनिक , माजी आमदार जनार्दन बोंद्रे यांचे कट्टर समर्थक ओळखले जात होते. सध्या ते चिखली तालुक्यातील कव्हळा गावचे सरपंच आहेत. नुकताच त्यांनी के चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी जाऊन बीआरएस मध्ये प्रवेश घेतला.
"के. चंद्रशेखर राव हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले नेते आहेत. आम्ही हैद्राबाद येथे गेलो, तिथे त्यांनी उभारलेले विकासाचे मॉडेल बघितले.आता ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्या मॉडेल चे अनुकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लवकरच भारत राष्ट्र समितीची मोठी जबाबदारी मिळणारआहे" असे रवींद्र डाळीमकर म्हणाले.