काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे सरकारी धोरणांच्या विरोधात मैदानात! चिखली विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणार!

आजपासून संविधान जागर यात्रा! ९ दिवस,१०२ गावे,७०० किलोमिटरचा प्रवास अन् बरच काही..! आज कोलारा येथे जाहीर सभा
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात निघणारी संविधान जागर यात्रा आज, २७ जानेवारी पासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात ९ दिवस ही यात्रा चालणार असून चिखली विधानसभा मतदारसंघातील १०२ गावांत ही यात्रा जाणार आहे. मेहकर फाट्यावरील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला अभिवादन करून या यात्रेचा प्रारंभ होणार आहे.
 आज,२७ जानेवारीच्या सकाळी ही यात्रा सुरू होईल. आज पहिल्या भालगाव, भानखेड, बेराळा, रोहडा, गांगलगाव, कवठळ, चंदनपुर, काटोडा, रानअंत्री, अंबाशी, खैरव, कोलारा या गावांत संविधान जागर यात्रा पोहचणार आहे. सायंकाळी ७ वाजता कोलारा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
  देश हुकुमशाहीच्या मार्गावर आहे. या देशाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले, या संविधानाच्या आधारावर देश चालवणे अपेक्षित असते मात्र सध्या, गल्लीतले सत्ताधारी, राज्यातले सत्ताधारी आणि केंद्रातले सत्ताधारी संविधानाची पायमल्ली करत आहेत. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ही संविधान जागर यात्रा असल्याचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले.