राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य करणाऱ्याचे डिपॉझिट जप्त करा! चिखलीच्या सभेतून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरींनी आ. गायकवाडांना गुंडा नेता म्हणून डिवचले!
म्हणाले, राहुल गांधी दलितांचा, वंचितांचा आवाज बुलंद करतात म्हणून....
Updated: Nov 12, 2024, 19:24 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राहुल गांधींची जीभ शोचित वंचित घटकांसाठी चालते. राहुल गांधी या देशातल्या अन्नदात्यासाठी बोलतात. ते सामान्यांच्या अधिकाऱ्यांसाठी बोलतात. सामान्यांच्या हक्कासाठी बोलणारी राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य बुलडाण्याचा गुंडा नेता करतो त्यामुळे राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य करणाऱ्या महायुतीवाल्यांचे डिपॉझिट जप्त करा असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यांनी केले. चिखली येथे आयोजित जाहीर सभेत कुणाल चौधरी यांनी महायुती सरकारच्या धोरणांचा खरपूस भाषेत समाचार घेतला..
यावेळी पुढे बोलतांना कुणाल चौधरी म्हणाले की, या देशात हिंदू संकटात नाही, मुस्लिमही संकटात नाही मात्र या देशातला शेतकरी संकटात आहे. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झाले पाहिजे मात्र विकासाचे मुद्दे माहितीकडे नाहीत असे कुणाल चौधरी म्हणाले. या देशातील शोषित, वंचित, गरीब, दलित या सर्वांनाच आता राहुल गांधीच हवे आहेत. मात्र शोषित वंचित आणि दलितांचा आवाज बुलंद करणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटण्याचे वक्तव्य बुलडाण्याचा गुंडा नेता करतो अशा शब्दात त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी टीकास्त्र सोडले. मध्यप्रदेशात लाडकी बहीण योजना बंद झाल्याचे ते म्हणाले. मोदी सरकार आणि महायुती सरकार खोटे आश्वासन देत आहे आता खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारला पराभूत करण्यासाठी आपल्याला एकत्रित व्हावे लागेल असेही कुणाल चौधरी म्हणाले.