महिलांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध ! संदीप शेळकेंचे प्रतिपादन! वन बुलडाणा मिशनच्या कार्यालयात साधला संवाद 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशनच्या जिल्हा संपर्क कार्यालयात ७ डिसेंबर २०२३ रोजी बुलडाणा येथील भीम नगर, परदेशी पुरा, सोळंकी-ले -आऊट यासह हतेडी, दहिद येथील शेकडो महिलांनी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी घरकुल तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळाला नाही, वाढते कर्ज, बेरोजगारी आदी समस्या सांगत वाढत्या महागाईत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाल्याचे महिलांनी सांगितले. संदीप शेळके यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.
राजर्षी शाहू परिवार गेल्या २२ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. धनिकच्या माध्यमातून आपण ४० हजार महिलांना २०० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. यामाध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कुठलेही राजकीय पद, सत्ता नसतांना वन बुलडाणा मिशन जिल्हावासियांच्या सुख -दु:खात, मदतीसाठी नेहमीच अग्रस्थानी असते. राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या या पुण्यभूमीत स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही महिलांच्या समस्या शासन सोडवू शकले नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी संदीप शेळके यांनी दिली.