अमडापूरात आ. श्वेताताईंच्या हस्ते ६ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन! रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवईं म्हणाले,
अख्खे आयुष्य काँग्रेसमध्ये घालवणाऱ्यांचाही
आ. श्वेताताईंच्या नेतृत्वार विश्वास! कारण.... श्वेताताई कधीच...
आ. श्वेताताईंनी चिखली विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्या करीत आहेत. विकासाच्या आड त्या कधीच राजकारण येऊ देत नाहीत. त्यामुळेच आतापर्यंत अख्खे आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलेले लोक सुद्धा श्वेताताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत असेही नरहरी गवई म्हणाले.
आ. श्वेताताई म्हणाल्या...
जनतेची सेवा हे व्रत घेऊन मी राजकारणात आली आहे. प्रगल्भ राजकीय विचाराशिवाय राजकारण होत नाही हे जरी खरे असले तरी विकासात राजकारण करणे हे लोकप्रतिनिधीच्या कर्तव्याच्या विरुद्ध आहे. मतदारसंघातील प्रत्येकाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. भाजपची आमदार आहे म्हणून विरोधी विचारांच्या लोकांची विकासकामे करायची नाहीत हा आपला स्वभाव नाही. राजकारण केवळ निवडणुकीपुरते त्यानंतर फक्त आणि फक्त विकासाभिमुख राजकारण हेच आपले धोरण आहे. सध्याचे केंद्रातले आणि राज्यातले सरकार विकासाभिमुख असल्याने विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन यावेळी आ.श्र्वेताताई महाले यांनी केले.
या कार्यक्रमाला कृष्णकुमार सपकाळ, बबनराव गोऱ्हे, बंडू अंभोरे, संतोष काळे , शाहिद पटेल राम जाधव, प्रशांत पाखरे, प्रवीण खंडेलवाल, अर्जुनराव नेमाडे, गजानन देशमुख , ललिता ताई माळोदे, गजानन चोपडे, नंदकिशोर जुमडे, रमेश देढे, गजानन जाधव, ज्ञानेश्वर देशमुख, संजय गवळी, गणेशराव माळोदे, शिवराम देशमुख, माधवराव देशमुख, अक्षय आदमाने, यांच्यासह भाजपा, शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम महायुतीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.