आ. श्वेताताई महाले म्‍हणतात, धन कमविण्याच्या नादात आरोग्याकडे नका करू दूर्लक्ष!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजच्या धकाधकीच्या काळात सर्वांचेच आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपल्या पूर्वजांनी आरोग्य धनसंपदा असल्याचे सांगितले. मात्र धन कमविण्याच्या नादात आरोग्याच्या धनाकडे सर्वांचेच दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे संपत्ती, कमाईसोबतच उत्तम आरोग्यासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केळवद येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात केले.
आज, १५ डिसेंबरला सौ. श्वेताताई महाले पाटील प्रतिष्ठानतर्फे केळवदमध्ये मोफत भव्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषध वाटप शिबीर पार पडले. शिबिराचा केळवद आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. जवळपास ३५० नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यातील ४० रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आली. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर काळे,  ॲड. दिलीप यंगड, सौ. व्दारकाताई भोसले, राजू नाटेकर, जीवन खंबायतकर, गणेश यंगड, संजय पाटील, के. पी. पाटील, सुरेश यंगड, सुभाष गायकवाड, संदीप पाटील, प्रल्हाद भारोडकार, दीपक पाटील, देविदास शिवतारे, समाधान गवई, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर थोरात यांच्यासह महिला व गावकरी  उपस्थित होते.