आ. कुटेंचा इशारा ः ...कुणी पक्षाच्या विरोधात गेला तर खबरदार!
भाजपा कार्यकर्त्यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर बुलडाणा शहरातील राजेश मंगल कार्यालयात झाले. समारोप करताना काल, २३ ऑक्टोबरला आ. डॉ. कुटे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. आमदार आकाश फुंडकर होते. चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, जिल्हा महामंत्री नंदकिशोर अग्रवाल, मोहन शर्मा, संतोष देशमुख, विजय कोठारी, योगेंद्र गोडे, तोताराम कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र आले तरी आपण एकजुटीने त्यांचा सामना करू, असे आवाहनही डॉ. कुटे यांनी यावेळी केले. सोशल मीडियावर देशाच्या पंतप्रधानांबद्दल कुणी टीका करत असेल तर त्याला उत्तरही त्याच भाषेत देण्याचे आवाहनही त्यांनी केले. चिखलीच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांना पक्षातून काढल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वेळ आल्यावर बोलू, एवढेच उत्तर पत्रकारांना दिले.
शेतकऱ्यांना मदतीबाबत धांदात खोटे...
शेतकऱ्यांना मदतीबाबत व पीक विम्याबाबत राज्य सरकार धांदात खोटे बोलत असून, आपण कधीही या विषयावर त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत, असे डॉ. कुटे या वेळी म्हणाले.