आ. महाले पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांची कापलेली वीज पुन्हा जोडून द्यावी, सक्‍तीची वीजबिल वसुली थांबवावी या मागण्यांसाठी चिखलीतील खामगाव चौफुलीवर काल, २९ नोव्‍हेंबरला आमदार श्वेताताई महाले यांनी रास्‍ता रोको आंदोलन केले होते. यामुळे शासनाच्या कोरोनाविषयक नियमांचा भंग झाल्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचेही उल्लंघन झाले. त्‍यामुळे चिखली पोलिसांनी आ. महाले पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
या प्रकरणात पोलीस कॉन्‍स्‍टेबल पंढरीनाथ मिसाळ यांनी तक्रार दिली. आ. महाले पाटील यांच्या नेतृत्त्वात भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी खामगाव चौफुलीवर जमले. त्‍यांनी मालकीची वाहने चौकात आडवी लावून वाहतुकीची कोंडी केली. त्‍यामुळे नियमांचा भंग झाला, असे तक्रारीत म्‍हटले आहे. आ. महाले पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडित देशमुख, राजेश अंभोरे, सागर पुरोहित, संतोष काळे, नामु गुरुदासानी, प्रकाश महाराज जवंजाळ, गोविंद देव्हडे, रामदास देव्हडे, श्याम वाकदकर, शेख अनिस शेख बुढन, रघुनाथ कुलकर्णी, सचिन कोकाटे, महेश लोणीकर, संजय अतार, विजय वाळेकर, शंकर उदकर, सुधाकर काळे, सुभाषअप्पा झगडे,  भगवान सोळंके, पंजाबराव धनवे, सुमंता मोरे, संदीप मोरे, सिद्धेश्वर मोरे, दत्तात्रय इंगळे, अंकुश तायडे, सचिन गरड, विलास जाधव, गोपाल शेळके, विजय चिंचोले, संजय महाले, शिवा वसू, महादेव ठाकरे, डिगांबर जाधव, योगेश राजपूत, अरुण गायकवाड, अरुण पाटील, गजानन परिहार, गोपाल परिहार, ज्ञानेश्वर वानखेडे, घनश्याम बंग, श्रीकांत शिंगारे,ख अक्षय भालेराव, एकनाथ कुटे, गणेश अंभोरे, बद्री पानगोळे, किशोर जामदार, सुरेंद्र पाटील, भारत दानवे, सुरज वानखेडे, ज्ञानेश्वर सवडे, गणेश परिहार, सौ. विमलताई देव्हडे, सौ. पूजा गाडेकर, सौ. सुनंदा शिंगारे, सौ. सिंधुताई तायडे, सौ. मीना इंगळे, सौ. द्वारका भोसले, सौ. निता सोळंके, शमशाद पटेल, सौ. मनिषा सपकाळ यांच्यासह सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते जे आंदोलनात सहभागी झाले होते त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.