चिखली विधानसभा मतदारसंघ पंढरी तर आमदार श्वेताताई वारकरी!
हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांचे गौरवोद्गार! मंगरूळ नवघरे , इसोली सर्कल मध्ये आ. श्वेताताईंच्या हस्ते ९ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !
आ. श्वेताताई म्हणाल्या,विकासाचा बॅकलॉग भरून निघतोय..
काल, २० फेब्रुवारीला मंगरूळ नवघरे येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे २ कोटी ९१ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पार पडले. मंगरूळ नवघरे चौफुली येथील पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांचे भूमिपूजन व अमडापूर लव्हाळा दुसरबीड या रस्ता सुधारणेसाठी ६ कोटी १० लक्ष रुपयांच्या कामाचेही भूमिपूजन यावेळी पार पडले. मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार लोककल्याणकारी योजना राबविणारे शासन आहे. महाविकास आघाडीच्या काळातील विकासाचा बॅकलॉग आता भरून निघत आहे असे प्रतिपादन यावेळी आ. श्वेताताईंनी केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, वसंतराव गाडेकर, विजय पाटील अंभोरे, बंडू अंभोरे, संतोष काळे,भारत म्हळसने, गणेशराव अंभोरे पाटील,विजय पाटील,मदन पाटील, विनोद सिताफळे , राजेश अंभोरे ,उध्दव महाराज जवंजाळ, कैलाश खरात, नंदू गुंजकर, बद्रीनाथ वाकडे, डॉ दिलीप अंभोरे, संजय खंडागळे, संजय घरत, वसंतराव अंभोरे, पंजाबराव नवघरे, विजय जाधव, जगन लहाने, गजानन अंभोरे, भरत सोळंकी, पंकज लोहार यांच्यासह आयोजक मंगरूळ नवघरेच्या सरपंच सौ. नलिनी ताई जाधव, भाजपा,शिवसेना, रिपाई आठवले गट, रासप, शिवसंग्राम, प्रहार चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.