खा.प्रतापराव जाधवांच्या प्रचाराचा झंझावात! वातावरण ढवळून निघणार; उद्या जेपी नड्डा वरवट बकालमध्ये, परवा रावसाहेब दानवेंची धाडमध्ये सभा! 

२३ तारखेला पंकजाताई दुसरबीडमध्ये तर मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री खामगावमध्ये घेणार सभा!२४ एप्रिलला नितीन गडकरींची चिखलीत सभा..
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली आहे. याआधीच्या अनेक निवडणुकांच्या प्रचाराचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याचा फायदा त्यांना होतांना दिसतोय. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देखील खा.जाधव यांची आघाडी कायम राहणार आहे. कारण शेवटच्या ४ दिवसांत बडे नेते खा. जाधव यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, भाजपच्या स्टार नेत्या पंकजाताई मुंडे, रक्षाताई खडसे यांचा समावेश आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.
Advt.👆
 उद्या,२१ एप्रिलला सकाळी ११ वाजता वरवट बकाल येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. खा.रक्षाताई खडसे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर दुपारच्या सत्रात खा.रक्षाताई खडसे आणि खा.प्रतापराव जाधव संयुक्तपणे मोताळा तालुक्यातील गावांचा दौरा करणार आहेत. २२ एप्रिलला केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची धाड येथे जाहीर सभा होणार आहे. महायुतीचे जिल्ह्यातील सर्वच नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. २३ एप्रिलला सकाळी ११ वाजता दुसरबीड येथे पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे खा.जाधव यांच्या प्रचारार्थ खामगाव येथे जाहीर सभा घेणार आहेत.प्रचाराच्या शेवटची दिवशी चिखली शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे.