खा.प्रतापराव जाधवांच्या प्रचाराचा झंझावात! गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ६ ठिकाणी होणार प्रचार कार्यालयांचे उद्घाटन; खा.जाधवांचा आजचा असा आहे दौरा..
Apr 9, 2024, 06:56 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव चौथ्यांदा विजयाची गुढी उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. आज,९ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन होणार आहे. लोकसभा क्षेत्रातील ६ विधानसंभामध्ये ६ प्रचार कार्यालये असणार आहेत. त्या कार्यालयातून खा.जाधव यांच्या प्रचाराची रूपरेषा आखली जाणार आहे.
आज सकाळी मेहकर येथील निवासस्थानी गुढी उभारून पूजन केल्यानंतर मेहकर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होईल. सध्या खा.जाधव यांचे असलेले शिवसेना जनसंपर्क कार्यालय हेच निवडणूक कालावधीत प्रचार कार्यालय असणार आहे. सकाळी ९ वाजता देऊळगाव राजा येथील बस स्टँड चौक, सकाळी साडेदहा वाजता चिखली येथील सुपर गेस्ट हाऊस जवळ खा.जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होईल. साडेअकरा वाजता बुलडाणा शहरातील गांधी भवन येथे, दुपारी दीड वाजता शेगाव येथील अग्रसेन चौक तर दुपारी साडेचारला खामगाव येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याजवळ,भारत वीज भांडार समोर जळगाव जामोद विधानसभेतील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्या त्या विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.